Goa Tourism: पर्यटकांची गोव्याशी अनोखी 'दिल्लगी'! मनाला भावणारं निसर्गसौंदर्य अन् बरचं काही...

Manish Jadhav

गोवा

गोव्याचं मोहीनी घालणारं सौंदर्य प्रत्येकाला खुणावतं. गोव्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात.

Goa Nature | Dainik Gomantak

मनमोहीतता

गोव्याला लाभलेले नयनरम्य निसर्ग सौंदर्य पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं. इथले समुद्रकिनारे तर पर्यटकांना साद घालतात.

Goa Tourism|Beaches | Dainik Gomantak

मन उडू उडू लागलं

गोव्यात येणारा प्रत्येकजण इथलं खुणावणारं निसर्ग सौंदर्य पाहून तर प्रेमात पडतोच, पण इथे आल्यानंतर त्याचं मन देखील उडू उडू लागतं.

Nature-rich Goa | Dainik Gomantak

जंगी माहोल

गोव्यात येणाऱ्या तरुण पर्यटकांचं आकर्षण म्हणजे इथले क्लब, हॉटेल, पार्ट्या, जलक्रिडा अन् बरचं काही... गोव्यातला जंगी माहोल नवख्या तरुण पर्यटकाला देखील साद घालतो.

Dance Club | Dainik Gomantak

निस्तेज मनाला उभारी

गोव्यातलं रमणीय वातावरण निस्तेज मनाला सतेज उभारी देतं. पर्यटकांची जणू गोव्याशी 'दिल्लगी' होऊन जाते.

Mayan Beach Club | Dainik Gomantak

गडकिल्ले

गोव्यातील गडकिल्ले येथील इतिहासाची एक झलक देऊन जातात. गोव्यात येणारा पर्यटक अग्वाद, शापोरा, तेरेखोल या किल्ल्यांना आवर्जून भेट देतो.

Fort in Goa | Google Image

जलक्रिडा

गोव्यात येणारे पर्यटक इथल्या जलक्रिडांचा मनमुराद आनंद लुटतात. सुखावणारं गोव्याचं लालित्य मनाला भारावून टाकतं.

White Water Rafting Goa | Goa Tourism
आणखी बघा