गोमन्तक डिजिटल टीम
गोवा आता जागतिक पर्यटन केंद्र झाले आहे. येथील समुद्रकिनारे, किल्ले, प्रार्थनास्थळे, फेस्टिव्हल्स पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
येथील पर्यटन उद्योगासमोर आता महत्त्वपूर्ण आव्हाने उभी आहेत. पर्यटक आता अनुभवात्मक पर्यटनाला प्राधान्य देत आहेत.
पर्यटन धोरणामध्ये शाश्वतता शुल्काची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे ज्यामुळे हे क्षेत्र पर्यावरणास अनुकूल राहील याची खात्री होईल.
बेपर्वा वाहन चालविणे, प्रदूषण तसेच पर्यटन भागात गैरवर्तणुकीचे असंख्य प्रकार समोर आले असून यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.
गोव्यात सध्या वर्षाकाठी १० दशलक्ष पर्यटक येतात त्यामुळे सध्या अति-पर्यटन हे एक महत्त्वाचे आव्हान आहे.
गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांची स्थिती बिघडत चाललेली आहे. यावरती आवश्यक उपाययोजना केल्या पाहिजेत.
राज्य सरकारने ‘गोवा पर्यटन प्रोत्साहन, व्यवस्थापन आणि नियमन विधेयक’ चा मसुदा तयार करुन तो सल्लामसलतीसाठी खुला केला आहे ही चांगली बाब आहे.