Akshay Kumar: अक्कीचा 'सरफिरा' लय भारी; ट्रेलरने मोडले रेकॉर्ड

Manish Jadhav

बॉलिवूडचा खिलाडी

बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार सध्या त्याच्या 'सरफिरा' चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चर्चेत आहे.

Akshay Kumar | Dainik Gomantak

अक्कीचा आगामी चित्रपट

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'सरफिरा'चा ट्रेलर इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. 'सरफिरा' चित्रपटाचा ट्रेलर 2024 मध्ये सर्वाधिक पाहिला गेलेला ट्रेलर बनला आहे.

Akshay Kumar | Dainik Gomantak

ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला

प्रेक्षकांना अक्षय कुमारच्या चित्रपटाचा ट्रेलर खूप आवडला आहे, लोक पुन्हा पुन्हा पाहत आहेत. इतकेच नाही तर अक्षय कुमारचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

Akshay Kumar | Dainik Gomantak

चित्रपटाची जोरदार चर्चा

या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये जोरदार चर्चा आहे. बॉलीवूडचा ॲक्शन हिरो अक्षय कुमार त्याच्या बहुप्रतिक्षित 'सरफिरा' चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Akshay Kumar | Dainik Gomantak

सरफिराच्या ट्रेलरचं होतयं कौतुक

'सरफिरा' चित्रपटाच्या ट्रेलरचे लोक खूप कौतुक करत आहेत. या चित्रपटात आजच्या तरुणाईच्या स्वप्नांचा चकनाचूर ते स्वप्न पूर्ण करण्यापर्यंतची धडपड दाखवण्यात आली आहे.

Akshay Kumar | Dainik Gomantak

व्ह्यूज

13 दिवसांपूर्वी रिलीज झालेला हा ट्रेलर आतापर्यंत 67 मिलियन म्हणजेच 6 कोटी 70 लाख लोकांनी पाहिला.

Akshay Kumar | Dainik Gomantak

सरफिरा कधी रिलीज होणार?

अक्षय कुमार आणि राधिका मदन यांचा आगामी चित्रपट 'सराफिरा' 12 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Akshay Kumar | Dainik Gomantak

मुख्य भूमिका

अक्षय कुमार बरोबर परेश रावल, राधिका मदन आणि सीमा बिस्वास यांसारखे दिग्गज कलाकारही 'सराफिरा' चित्रपटात दिसणार आहेत.

Akshay Kumar | Dainik Gomantak