Akshata Chhatre
गोवा ते चिकमंगळूर हा प्रवास रेल्वेने करायचा असल्यास सुमारे 7 तास 27 मिनिटं लागतात, या प्रवासात तुम्ही एकूण 467 किमीचं अंतर गाठत असता.
राणी चेन्नमा, पंचगंगा एक्सप्रेस, विश्वमानव एक्सप्रेस अशा ट्रेन्स हा प्रवास करतात. सकाळी पहिली ट्रेन पहाटे ६:३० वाजता निघते तर शेवटची ट्रेन रात्री ११:३० वाजताची आहे.
कादूर हे चिकमंगळूरच्या जवळचं प्रमुख रेल्वे स्थानक आहे. तिथून तुम्ही कॅबने किंवा बसने चिकमंगळूरला जाऊ शकता.
गोवा ते चिकमंगळूर हा प्रवास करण्यासाठी ११ तासांचा प्रवास करावा लागतो. ही बस संध्याकाळी निघते आणि तिकिटाचा खर्च हजार रुपयांच्या आसपास जातो.
गोवा ते चिकमगळूर ड्राइव्ह करताना वेस्टर्न घाटातील हिरवाई, वळणदार रस्ते आणि सुंदर निसर्ग याचा आनंद घेता येतो.
NH66 ते NH75 या मार्गाने प्रवास करा. ब्रेक पॉइंट्स, फूड स्टॉप्स आणि पेट्रोल पंप आधी शोधून ठेवा. गाडीची स्थिती चांगली आहे का हे तपासा. तुमच्या वेळ, बजेट आणि पसंतीनुसार योग्य पर्याय निवडा आणि चिकमंगळूरच्या सौंदर्याचा अनुभव घ्या!