Manish Jadhav
गोवा म्हटलं की, सर्वाग सुंदर इथले समुद्रकिनारे, मंदिरे आणि पश्चिम घाटाचं निसर्ग सौंदर्य लगेच डोळ्यासमोर तरळून जातं.
गोव्याच्या निसर्ग सौंदर्यांची ख्याती जगभर आहेच, शिवाय इथली मंदिर संस्कृतीही गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना मोहित करते.
आज (7 फेब्रुवारी) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून गोव्यातील अशा दोन मंदिराविषयी जाणून घेणार आहोत,जिथे पर्यटक सातत्याने येणं पसंत करतात.
जुन्या धाटणीचे गोव्यातील हे मंदिर एक महत्त्वाचे देवस्थान आहे. या मंदिरावरील कोरीवकाम पर्यटकांना भुरळ पाडते. या मंदिराची पाण्याची टाकी झऱ्याच्या गोड पाण्याने भरलेली असते.
श्री लक्ष्मी नरसिंह हे मंदिर म्हार्दोळ येथील वेलिंगा येथे आहे.
श्री लक्ष्मी नरसिंह मंदिराशिवाय गोव्यातील श्री ब्रह्मा मंदिरही खूप प्रसिद्ध आहे. ब्रह्मदेवाची शोभिवंत मूर्ती इथे येणाऱ्या प्रत्येकाला मंत्रमुग्ध करते.
श्री ब्रम्हा मंदिर सत्तरीतील कांरबोळ येथे आहे.