Manish Jadhav
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक कुंभमेळ्याला पोहोचत आहेत.
गोमंतकीयांना कुंभमेळ्यात सहभागी होता यावं, यासाठी गोवा सरकारकडू विशेष रेल्वेसेवा सुरु करण्यात आलीय. गोव्यातून कुंभमेळ्यात जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्यास गाड्यांची संख्या आणखी वाढवली जाईल," असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
गोवा भाजपच्या महिला नेत्या पल्लवी धेंपे यांनीही प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्याला हजेरी लावली.
पल्लवी धेंपे यांनी कुंभमेळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
जगातील सर्वात मोठ्या आणि शांततापूर्ण भाविकांच्या मेळ्यात सहभागी होण्याचा आनंद काही औरचं आहे. इथली आध्यात्मिक ऊर्जा अनुभवण्यासारखी आहे, अशी प्रतिक्रिया धेपें यांनी दिली.
पवित्र स्नान केल्यानंतर पल्लवी धेंपे यांनी महतांचा आशिर्वाद घेतला.