Sameer Panditrao
राज्यात मागील दोन-चार दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
कमाल तापमानात वाढ होत असून आज राज्यात ३४.६ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.
सामान्य तापमानाच्या तुलनेत २. ३ अंश सेल्सिअसने अधिक झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत
पुढील चार-पाच दिवस ही तापमानवाढ कायम राहणार
कमाल तापमान ३५ अंशांवर जाण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.
सकाळी ११ नंतर दुपारी ४ वा.पर्यंत मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवेल. ऋतुमान बदलामुळे सातत्याने काही प्रमाणात तापमान वाढ होत राहील.
पणजी येथे कमाल ३४.४ अंश सेल्सिअस तर किमान २३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.