Ganeshprasad Gogate
जेवणानंतर काहीतरी गोड पदार्थ किंवा मिठाई खाण्याची सवय आपल्यापैकी बहुतांश लोकांना असते.
काही लोकांना तर याची इतकी सवय लागते, की ते त्याच्या आहारीच जातात. जेवल्यावर गोड खाल्ल्याशिवाय राहूच शकत नाहीत.
मिठाईमुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते. त्यामुळे आपल्या शरीरात चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर मिठाई खाणे आवर्जून टाळा.
तसेच जेवण आणि झोप यात कमीत कमी २ तासांचे अंतर ठेवा. जेवल्यावर लगेच झोप नका, थोड शतपावली करा. नाहीतर गॅसेसचा त्रास होऊ शकतो.
वजन वाढण्यासोबतच रात्रीच्या जेवणानंतर गोड खाल्ल्याने आपल्या पचनसंस्थेवरही वाईट परिणाम होतो. यामुळे आपली पचनक्रिया बिघडू शकते.
रात्री सतत मिठाई खाल्ल्याने तुमच्या हृदयावरही परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.