Manish Jadhav
गोव्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात सनबर्न फेस्टिव्हल साजरा केला जातो.
सध्या सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनावरुन गोव्याच्या राजकारणात वादंग सुरु झालाय.
विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनावरुन सरकारवर निशाणा साधला.
दक्षिण गोव्यात सनबर्नचे आयोजन होणार हे सरकारने सोडलेले पिल्लू आहे, असे सरदेसाई म्हणाले.
दक्षिणेत होणाऱ्या विरोधाचा दाखला देत भाजप सरकारला उत्तर गोव्यातच सनबर्नचे आयोजन करायचे असल्याचा दावाही सरदेसाई यांनी केला.
वर्षाअखेरीस दरवर्षी उत्तर गोव्यातील वागातोर येथे सनबर्नचे आयोजन केले जाते. यावर्षी मात्र याचे स्थान बदलून ते दक्षिणेत स्थलांतरीत करणार असल्याची घोषणा आयोजकांकडून करण्यात वाद सुरु झाला.
युरी आलेमाव म्हणाले की, उत्तर गोव्यात ड्रग, गुन्हे यांचे साम्राज्य निर्माण केल्यानंतर भाजप सरकारने आता दक्षिण गोव्यावर वक्रदृष्टी वळवली.