Akshata Chhatre
उन्हात त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी SPF 30 किंवा त्याहून जास्त सनस्क्रीन वापरा. ते सहलीसाठी अनिवार्य आहे.
डोळ्यांना तीव्र उन्हाच्या किरणांपासून वाचवण्यासाठी चांगल्या प्रतीच्या सनग्लासेसचा वापर करा.
डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ बांधल्याने उन्हापासून संरक्षण मिळते आणि उष्णता कमी जाणवते.
डिहायड्रेशन टाळण्यासाठी वारंवार पाणी आणि लिंबूपाणी किंवा नारळपाणी प्या.
12 ते 4 वाजताच्या दरम्यान उन्हाची तीव्रता जास्त असते, त्यामुळे शक्यतो सावलीत रहा किंवा विश्रांती घ्या.
उन्हाळ्यात अंगाला आरामदायक आणि हवेशीर सूती कपडे घाला, जेणेकरून घाम येऊनही त्रास होणार नाही.
तळलेले आणि तेलकट पदार्थ टाळा. फळे, भाज्या आणि हलका आहार घेतल्याने तब्येत चांगली राहील.