Manish Jadhav
गोव्याच्या निसर्ग सौंदर्याबरोबर येथील खाद्यसंस्कृतीही खाद्यप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे.
गोव्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळते. येथे तुम्हाला नंबर 1 स्ट्रीट फूडचा आस्वाद घ्यायला मिळेल. आज आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून कटलेट ब्रेड या स्नॅक्सबद्दल जाणून घेणार आहोत.
कटलेट ब्रेड हे त्या स्नॅक्सपैकी एक आहे जे गरम केकसारखे विकले जाते.
पणजीत मिरामार बीचवर डिसील्वाची कटलेट्स खूप फेमस आहे. येथे तुम्हाला कटलेटचे तब्ब्ल 120 प्रकार खायला मिळतात.
बीफ कटलेटसाठी खवय्यांचा मोठी गर्दी पाहायला मिळते. बीफच्या मोठ्या तुकड्याला आधी आलं-लसूण पेस्ट आणि व्हिनेगर लावून मॅरीनेट करुन मग रव्यामधून घोळून तेलात डीप फ्राय केले जाते.
बीफ चिली फ्राय, पोर्क क्रीम चॉप सारखे वेगळे पदार्थ येथे मिळतात.
‘फिशिटेरिन’ खवय्यांसाठी खास चविष्ट फिश कटलेट देखील येथे मिळतात. समुद्र किनाऱ्यावर भटकंती झाल्यावर भूक लागली की अनेकांचे पाय आपोआप डिसील्वाची कटलेट खायला वळतात. हा पदार्थ 60 किंवा 150 रुपयाला मिळतो.