Manish Jadhav
गोवा म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर पटकन वरदान लाभलेलं निसर्ग सौंदर्य, निळाशार समुद्रकिनारा, नाईटलाईफ येते. पण हे सोडूनही गोव्यात अनेक प्रसिद्ध देवी-देवतांचे मंदिरे देखील आहेत.
गोव्यात देवी-देवतांची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. आज आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून शिरोड्याच्या कामाक्षी देवीबद्दल जाणून घेणार आहोत.
कामाक्षी देवीमुळे शिरोडा गावाला विशेष महत्त्व व ओळख लाभलेली आहे. फोंडा तालुक्यातील ही मंदिरे केवळ गोव्यात नव्हे तर देश विदेशामध्येही प्रसिद्ध आहेत.
शिरोडा येथील श्री कामाक्षी देवी भक्तांचे श्रद्धास्थान बनली आहे. श्री कामाक्षीचे भक्तगण हे केवळ गोव्यातच नसून महाराष्ट्र, कर्नाटक तसेच देश-विदेशामध्येही स्थायिक आहेत.
दर अमावास्येला कामाक्षी देवीच्या मंदिरात अमावास्येला भक्तगणांची सकाळ ते रात्रीपर्यंत अफाट गर्दी असते.
राज्यातील विविध भागातील लोक आपले दुःख तसेच मनोकामना नवसाच्या रुपाने देवीपुढे मांडतात.
अमावास्याप्रमाणे देवीचा नवरात्री उत्सवही तेवढ्याच उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्री उत्सवात देवीसाठी सजवण्यात आलेला मखर अत्यंत आकर्षक असतो. सोन्या दागिन्याने नटलेली श्री कामाक्षी देवी मखरात शोभून दिसते.