Akshata Chhatre
शिगमोत्सवात गोव्यात एक वेगळीच दुनिया पाहायला मिळते. या शिगमोत्सवाच्या काळात गोव्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये उत्सव होतात.
शिगमोत्सव म्हटलं की गोव्यात गड्यांचा उत्सव हा आलाच. गावागावांप्रमाणे या गड्यांची परंपरा बदलात जाते.
दक्षिण गोव्यात मल्लिकार्जुन देवळाची मोठी ख्याती आहे. या देवळाला श्रीक्षेत्र मानलं जातं आणि काणकोणमध्ये होणार गड्यांचा उत्सव सुद्धा भलताच वेगळा असतो.
या उत्सवात तीन गडयांच्या डोक्यावर भात शिकजवला जातो. आश्चर्यचकित झाला ना?
पण हे खरं आहे. पौर्णिमेनंतर होणाऱ्या या उत्सवात तीन स्थानिकांना गडे बनवलं जातं. असं म्हणतात देव या गड्याचं रक्षण करतो.
तीन गडे एकत्र घेऊन त्यांच्या डोक्याला थंड कापड गुंडाळलं जातं, सोबतच त्याला केळंब्याचं आवरण असतं. तिघांना एकत्र आणून त्याच्या डोक्याची चूल केली जाते.
या चुलीवर भात शिजवला जातो. काणकोणमधील मल्लिकार्जुनाच्या देवळात तीन वर्षानंतर एका हा उत्सव भरतो. शिशिरान्नी असं म्हटलं जातं.