Pramod Yadav
गोमन्तकीय दरवर्षी आतुरतेने वाट पाहतात तो सण म्हणजे शिमगोत्सव.
शिमगोत्सवातून गोव्याच्या समृद्ध, वैभवशाली भव्य संस्कृतीचे दर्शन घडते.
राज्यात 24 मार्चपासून शिमगोत्सवाला प्रारंभ झाला असून, विविध ठिकाणी शोभायात्रा पाहायला मिळत आहेत.
तसेच, शबयऽ शबयऽऽ, घुमचे कटर घुम आणि ओस्सय ओस्सयचे आवाज घुमू लागले आहेत.
शिमगोत्सवात घोडे-मोडणी, फुगडी रोमटामेळ यासह विविध प्रकराचे चित्ररथ मिरवणूक पाहायला मिळतात.
याच काळात राज्यात साळ येथील गडे उत्सव, झर्मे आणि धावेचा चोरोत्सव मळकर्णेतील शेणीऊजो व सांगेतील वीरभद्र पाहायला मिळतात.
फोंडा आणि सांगेतील न्वहरो, गजानृत्य, तालगडी, काणकोणात शिरी रान्नी यासारख्या प्रथांचे पालन केले जाते.