Pramod Yadav
भाजपने गोव्यातील दोन्ही लोकसभा उमेदवारांची घोषणा केली असून, प्रचाराचा नारळ फोडला आहे.
दोन्ही उमेदवारांनी पणजीचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ केला.
भाजप राज्यातील दोन्ही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकण्याचा दावा करत असले तरी यावेळी पक्ष आणि उमेदवारांना काही आव्हांनाचा सामना करावा लागणार आहे.
राज्यातील नाराज असलेला एसटी समाज एक प्रमुख आव्हान पक्षासमोर आहे. एसटी नेत्यांनी भाजपच्या विरोधात प्रचार करण्याचे सांगितल्याने पक्षाला फटका बसू शकतो.
दक्षिण गोव्यात भाजपने पहिल्यांदाच महिला उमेदवार दिला आहे. पल्लवी धेंपे श्रीमंत घरातून येत असल्याने त्यांना गरिबांच्या व्यथा कळतील का? अशी सोशल पोस्ट व्हायरल होत आहे.
पल्लवी धेंपे नव्याने राजकारणात प्रवेश करत असल्याने त्यांना नेतृत्व, वतृत्व याचा अनुभव नसल्याने दक्षिणेतील मतदारांचा विश्वास जिंकण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
गोव्यात भाजपच्या दोन्ही उमेदवारांविरोधात अपप्रचार होत असल्याने तो प्रचार रोखण्याचे आव्हान पक्षासमोर आहे.