गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात सध्या मासळीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे, यामुळे स्थानिक बाजारात विविध प्रकारचे मासे उपलब्ध आहेत.
बांगडे मासे आता स्वस्त मिळत आहेत. मागील काही आठवड्यांत वाढलेल्या आवकेमुळे त्याचे दर कमी झाले आहेत.
स्थानिक गोव्यातील लोकांना स्वस्त मासळी मिळत आहे, त्यामुळे घराघरात बांगड्याचा स्वाद मिळत आहे.
मध्यम आकाराचे बांगडे १०० रुपयांना आठ ते दहा या दराने विकले जात आहेत. मोठ्या बांगड्यांचा दर मात्र २०० रुपये किलो असा आहे.
एका टोपलीचा दर ८०० ते १००० रुपये असा आहे.
मासळीची मोठ्या प्रमाणात आवक आणि वाढलेली विक्री यामुळे मच्छीमार समुदायालाही आर्थिक फायदा मिळत आहे.
मार्केटमध्ये आता बांगडा आणि इतर मासे खरेदीसाठी गर्दी होत आहे.