गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात देशविदेशातून अनेक पर्यटक भेट देतात.
तुम्हाला माहिती आहे का गोवा म्हणलं कि पर्यटकांच्या डोळ्यांसमोर कोणती ठिकाणे येतात?
बागा बीच गोव्यातील एक अतिशय लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. जलक्रीडा, नाइटलाईफ, आणि रंगीबेरंगी शॅकसाठी ते प्रसिद्ध आहे.
कळंगूट गोव्यातील सर्वात मोठा आणि गजबजलेला बीच आहे. पर्यटकांची गर्दी, शॉपिंगसाठी हे परिपूर्ण स्थान आहे.
जुने गोवा ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीसस आणि सेंट कॅथेड्रल चर्च अशी अनेक स्थळे पाहता येतात.
पालोलेम बीच दक्षिण गोव्यातील एक अद्भुत आणि शांत समुद्रकिनारा आहे.
अंजुना बीच त्याच्या ट्रान्स पार्टी आणि अनोख्या वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.