Manish Jadhav
गोवा म्हणजे निसर्गाने मानवाला बहाल केलेला सुंदर दागिनाच. दरवर्षी मोठ्याप्रमाणात पर्यटक गोव्याला भेट देतात. इथे पर्यटक आवर्जून प्रसिद्ध मंदिरांना भेटी देतात.
गोव्यात अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही मंदिरे पर्यटकांना आकर्षित करतात. यापैकी एक सप्तकोटेश्वराचं मंदिर...
रमणीय आणि शांत परिसर, चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेले हे शंकराचे जुने मंदिर. त्यास गोव्याच्या शैलीनुसार एक मोठी दीपमाळ आणि स्वच्छ व सुंदर परिसर लाभला आहे.
पोर्तुगिजांनी गोव्यातील अनेक हिंदू मंदिराची विटंबना केली, ज्यामध्ये एक सप्तकोटेश्वर मंदिरही होते.
पोर्तुगिजांनी विटंबना केलेल्या या सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता.
मंदिराजवळ असलेल्या देवीच्या मंदिरातील महिषासुरमर्दिनीची मूर्तीही तुम्हाला पाहायला मिळेल.
पणजी-म्हापसा-डिचोलीमार्गे नारवे येथे जाता येते. मंदिरापर्यंत पक्का रस्ता आहे. गर्द झाडा-झुडपांत वसलेले हे मंदिर प्रेक्षणीय आहेच; पण त्याचे ऐतिहासिक महत्त्वही मोठे आहे.