Akshata Chhatre
सांंजाव म्हटले की अंगात एक प्रकारची ऊर्जा अंगात आपोआपच संचारते.
हातात चुडताचा पीडा घेऊन मुले एकत्रितपणे पाण्याने भरलेल्या विहिरीत उड्या मारतात, घरातील नवविवाहित दांपत्ये त्यांना मिष्टान्न खायला देतात.
सांजाव उत्सवात एखाद्याच्या अंगणात पोहोचले की अनेकजण आपोआप शीघ्रकवी बनतात. ज्याचे ते अंगण असेल त्या यजमानाचे नाव गाण्याच्या ओळीत गुंफून गाणी म्हटली जातात.
हा उत्सव सेंट जॉन द बाप्तिस्त यांच्या स्मृतींशी संबंधित आहे.
सांजावच्या निमित्ताने घरात शिजणाऱ्या अनोख्या पाककृती हे देखील सांजाव आवडण्याचे एक कारण आहे.
विहिरीत मस्तपैकी उड्या मारणं, डोक्यावर फुलांचे मुकुट परिधान करणं किंवा भिजण्याचा आनंद ही सणाची मजा आहे.