विहिरीत उड्या मारण्याचा उत्सव; गोव्यातील 'सांजाव'चा नक्की आनंद घ्या

Pramod Yadav

'सांजाव'ची ओढ

गोव्यात दरवर्षी पावसाळ्यात सर्वांना 'सांजाव'ची ओढ लागते, निखळ आनंदाचा उत्सव म्हणून हा प्रसिद्ध आहे.

Sao Joao Festival Goa | Dainik Gomantak

कॅथलिक समाज

मुख्यत्वे कॅथलिक समाजात प्रसिद्ध असलेला हा उत्सव दरवर्षी 24 जून रोजी साजरा केला जातो.

Sao Joao Festival Goa | Dainik Gomantak

पर्यटकांना आकर्षण

स्थानिकांसह देश विदेशातील पर्यटकांना देखील या उत्सवाचे मोठे आकर्षण असते.

Sao Joao Festival Goa | Dainik Gomantak

सेंट जॉन

सांजाव (Sao Joao) या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ सेंट जॉन असा होतो. सेंट जॉन बाप्टिस्टच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो.

Sao Joao Festival Goa | Dainik Gomantak

मेरीची भेट

सेंट जॉन आई एलिझाबेथच्या पोटात असताना प्रभू येशूची आई मेरीने एलिझाबेधच्या घरी भेट दिली.

Sao Joao Festival Goa | Dainik Gomantak

भेटीचा आनंद

या भेटीने खूश झालेल्या सेंट जॉनने आईच्या पोटातच आनंदाने उडी मारली अशी मान्यता आहे.

Sao Joao Festival Goa | Dainik Gomantak

आनंदोत्सव

याचे प्रतिक म्हणून सांजाव दिवशी देखील विहिरीत उडी मारुन हा आनंदोत्सव साजरा केला जातो.

Sao Joao Festival Goa | Dainik Gomantak
Dainik Gomantak | Dainik Gomantak