Pramod Yadav
गोव्यातील अभयारण्ये व वनश्रेत्रातील धबधब्यांवर पर्यटकांना जाण्यास वन खात्याने ५ जून रोजी घातलेली बंदी मागे घेण्यास वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु झाल्या.
राज्यातील सुरक्षित धबधबे सर्वांसाठी खुले करण्याबाबत लवकरच आदेश जारी केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पर्यटन खात्याशी चर्चा न करता राज्यातील धबधब्यांवर घातलेली बंदी चुकीची असल्याचे मंत्री खंवटे यांनी म्हटले.
यानंतर वनमंत्री राणे यांनी राज्यातील सोळा सुरक्षित धबधबे सर्वांसाठी खुले करता येतील असे जाहीर केले.
यामध्ये पाली, हिवरे, चरावणे, गोळावली, गुंडल्डे, चिदंबरम, नानेली, उकैची खाडी, कुमठाळ तसेच...
मादियानी, खाडी गुळूसे, बांधावयलो वझर, दूधसागर मंदिरालगत, भाटी, नेत्रावळी, कुस्के या धबधब्यांचा समावेश आहे.
तर, राज्यातील नेत्रावळी, दूधसागर, तांबडी सूर्ला, भोमा, मैनापी यासारखे धबधबे धोकादायक श्रेणीत ठेवण्यात आले आहेत.