Manish Jadhav
देशात पर्यटनासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत पण त्यातही गोवा पर्यटकांसाठी खूप खास... दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात.
गोव्याला लाभलेली निसर्गाची कांती पर्यटकांना मोहीनी घालते. मनाला प्रसन्न करणारी इथली शांतता पर्यटकांना हवी-हवीशी वाटते.
तुम्ही तुमच्या गोवा ट्रीपमध्ये गोव्यातील ग्रामीण जीवन नक्की अनुभवले पाहिजे. नारळी-पोफळीच्या बागा, कौलरु घरांची अरास तुम्हाला मनमोहित करेल.
गोवा ट्रीपमध्ये तुम्ही इथल्या गावांची सैर नक्की केली पाहिजे. विलोभनीय सौंदर्यांनं नटलेली गावं प्रत्येकाला भुरळ पाडतात.
गोव्यात तुम्हाला एकाच धाटणीची घरं पाहायला मिळतात. इथे तुम्हाला कौलारु घरांची आरास पाहायला मिळते.
गोव्यातील गावांमध्ये तुम्ही सुखाची अनुभूती नक्की अनुभवाल.