गोमन्तक डिजिटल टीम
गोवा आपल्याला नेहमीच रोमँटिक वाटतो पण गोव्यातील बेस्ट रोमँटिक डेटसाठीचा ऑप्शन तुम्हाला माहिती आहे का?
रोमँटिक डेटसाठी बीच कॅफेसारखी उत्तम जागा कुठेही मिळणार नाही. का ते जाणून घेऊ.
गोव्याच्या सुंदर वातावरणात बीच कॅफेची मजा द्विगुणित होते.
लाटांचा आवाज आणि सूर्यास्ताच्या नजाऱ्यासह प्रिय व्यक्तीसह वेळ घालवण्याचा आनंदच निराळा.
बहुतांश बीच कॅफे रोमँटिक लाइटिंग, कैंडल लाइट आणि फुलांनी सजलेले असतात. रात्री बीच कॅफे आणखी सुंदर वाटतात.
मोकळ्या हवेत जेवण आणि गप्पा मारण्याचा आनंद अवर्णनीय असतो .
समुद्रकिनारी असलेले हे कॅफे गर्दीपासून दूर असल्यामुळे कपल्ससाठी परफेक्ट आहेत.