Ganeshprasad Gogate
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या प्रजासत्ताक भारताचा यंदा अमृत महोत्सव आहे.
या काळात भारतानं असं एकही क्षेत्र शिलूक ठेवलेलं नाही ज्यात त्यांनी यश मिळवलेलं नाही. विज्ञान तंत्रज्ञानापासून ते आरोग्य, उद्योगापर्यंत जगाला अचंबित करणारी प्रगती भारतानं गेल्या 75 वर्षांत केली आहे.
खऱ्या अर्थानं लोकशाही प्रजासत्ताक यशस्वी करून दाखवलं आहे. प्रजासत्ताक व्यवस्था स्वीकारताना एक उत्तम दस्तऐवज ठरेल असं संविधान आपण तयार केलं.
नागरिकांना अनेक मूलभूत अधिकार देण्यात आले, तसंच त्यांच्यासाठी आदर्श आणि मूलभूत कर्तव्यंही सांगून ठेवली.
भारतानं संसदीय व्यवस्था स्वीकारलेली आहे. तसेच संघ राज्य व्यवस्थेमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात यथोचित असं अधिकारांचं वाटप करण्यात आलं आहे.