Sameer Panditrao
गोव्यात एकूण १,५४३ मिमी म्हणजेच ६०.७७ इंच पावसाची नोंद झाली आहे.
आतापर्यंत सर्वाधिक २,२४२.९ मिमी म्हणजेच तब्बल ८८.३० इंच पावसाची नोंद धारबांदोड्यात करण्यात आली आहे.
तरीही राज्यात सरासरी पावसाच्या तुलनेत १.६ टक्के पावसाची कमतरता आहे.
राज्यातील तीन केंद्रांवर पावसाने ८० इंच पावसाचा टप्पा पूर्ण केला आहे.
धारबांदोडा येथे ८८.३० इंच, सांगे ८२.२४ इंच आणि वाळपई येथे ८०.५५ इंच पावसाची नोंद झालीये.
मुरगावात आतापर्यंत केवळ ३६.६१ इंच पाऊस पडला आहे.
त्यामुळे काही भागांत अतिशय मुसळधार, तर काही भागांत अतिशय अल्प पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.