Manish Jadhav
गोव्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केलीय.
गोव्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पूरदसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय.
डिचोलीत पावसानं हाहाकार माजवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत.
डिचोलीतून वाहणारी नदी ओसंडून वाहत असून, बहुतांश भाग जलमय झाला आहे.
आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. मात्र जोरदार पर्जन्यवृष्टी होऊनही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून देण्यात आलीय.
डिचोली शहराला असलेल्या खाण खंदकातील पाणी सोडण्यात आल्याने शहरात पाणी वाढून बाजारात घुसले.
पुन्हा पावसाचा कहर सुरु झाल्याने डिचोलीतील व्यापारीवर्ग चिंतेत आहे. पावसाच्या तडाख्यात खंदकातील पाणी बाहेर सोडू नका, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.