Manish Jadhav
विविधतनेने नटलेल्या गोवा प्रत्येकाने पाहिला पाहिजे. निसर्गाचं सानिध्यात कधीतरी जावून पाहावं असं म्हणतात. ते सानिध्य तुम्ही गोव्यात अनुभवू शकता.
गोव्याची जैवसंपदा आपण नक्की पाहिली पाहिजे. आज आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून कोटिगाव अभयारण्याविषयी जाणून घेणारोत.
कोटिगाव वन्यजीव अभयारण्य हे गोव्यातील दुसरे सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य आहे.
पणजीपासून सुमारे 60 किमी अंतरावर असलेले हे अभयारण्य 1969 मध्ये स्थापन झालेले आहे.
कोटियागो वन्यजीव अभयारण्य सुमारे 86 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले आहे. येथील घनदाट जंगलातून सूर्यप्रकाशही जाऊ शकत नाही अशा पद्धतीने निसर्गाची रचना केली आहे.
कोटिगाव वन्यजीव अभयारण्यात तळपोना आणि गालजीबागा या दोन नद्या वाहतात.
हे अभयारण्य कर्नाटकाच्या सीमेला लागून असलेल्या काणकोण तालुक्यात आहे. अभयारण्यात सहा टेहळणी बुरुज असून त्यांचा वापर वन्यजीव पाहण्यासाठी करता येतो.
कोटिगाव अभयारण्य पक्ष्यांच्या 200 हून अधिक प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या 25 प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 80 प्रजाती आणि कीटक आणि फुलपाखरांच्या असंख्य प्रजातींचे घर आहे.