Goa Road: कुठं आहे रस्ता? गोमंतकीयांची सहनशक्ती संपत चालली आहे

Sameer Panditrao

म्हापसा

म्हापसा मतदार संघातील सर्व रस्त्यांचे खोदकाम करून त्यामधून केबल घालण्याचे काम सुरू होते. रस्त्यांचे डांबरीकरण केले नसल्यामुळे या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे.

Goa Bad Roads | Dainik Gomantak

तिसवाडी

पावसाळ्यात तिसवाडीतील रस्त्यांची दुरवस्था होण्याची समस्या कायमचीच आहे. पावसाप्रमाणेच ही समस्या उद्‍भवत असल्याचे दिसते.

Goa Bad Roads | Dainik Gomantak

बेतोडा

फोंडा तालुक्यातही अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. विशेषतः बेतोडा येथील खराब रस्त्याचा विषय ग्रामसभेत चर्चेला आला होता.

Goa Bad Roads | Dainik Gomantak

सासष्टी

सासष्टी तालुक्यात रस्त्यांची चाळण झाली आहे.  गणेश उत्सवात यंदा मुसळधार पाऊस बरसला  व नेहमी प्रमाणे रस्‍त्‍यावरील डांबर उखडून मोठे खड्डे पडले आहेत.

Goa Bad Roads | Dainik Gomantak

वाळपई

वाळपई नगरपालिका क्षेत्रातील वेळुस नगरगाव मार्गावरील श्री रवळनाथ मंदिराकडील मुख्य रस्त्याची चाळण झाली असून प्रवाशांना खड्ड्यातूनच वाट काढून जावे लागत आहे.

Goa Bad Roads | Dainik Gomantak

सांगे

पावसाळ्यात रस्त्यांची झालेली वाताहात पाहता वाहनाना डोकेदुखी बनलेली असून प्रवासी बस गाड्यातून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांनासुद्धा शारीरिक दृष्टीने त्रास सहन करावे लागत आहेत.

Goa Bad Roads | Dainik Gomantak

पेडणे

पेडणे ते भटवाडी हरमल, पार्से ते आगरवाडा, चोपडे ते मोरजी, मराठवाडा मांद्रे, आराबो ते तुये रैना क्रिकेट मैदानापर्यंत मध्ये मध्ये अशा अनेक रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे.

Goa Bad Roads | Dainik Gomantak

भारत बांधणार 'मंगळा'वर घरे!

India Mars Mission