Pramod Yadav
टेनिसपटू तनिषा क्रास्टो आणि अश्विनी पोनाप्पा या दोघी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्या आहेत. यातील तनिषा मूळ गोमंतकीय आहे.
पीटर पॉउल फर्नांडिस हे पहिले गोमंतकीय आहेत, ज्यांनी १९३६ बर्लिन येथे भारतीय हॉकी टीममधून खेळताना सुवर्ण पदक जिंकले होते.
उत्कृष्ट गोलकिपर म्हणून प्रसिद्ध असणारे लिओ पिंटो यांनी १९४८ साली इतर चार गोमंतकीयांसह सहभाग घेतला होता.
मेरी डिसोझा सिक्वेरा यांनी १९५२ सालच्या फिनलँड येथे ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. ऑलिम्पिकमध्ये धावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला धावपटू होत.
१९८० साली मॉस्को येथे भारतीय हॉकी संघाने सुवर्ण पदक जिंकले होते. यात गोमंतकीय मीरविन फर्नांडिस यांचा सहभाग होता.
१९६० च्या रोम येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कोलवाळ येथील फोर्तुनातो फ्रँको यांनी एका फुटबॉल इव्हेंटमध्ये सहभाग घेतला होता.
१९८० साली झालेल्या मॉस्को येथील ऑलिम्पिकमध्ये एलिजा नेल्सन, सेल्मा डिसिल्वा, लॉरेन फर्नांडिस आणि मार्गेरेट तोसकानो या भारतीय महिला हॉकी टीमच्या सदस्य होत्या.