Pramod Yadav
गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे दहा दिवस पूर्ण झाले असून, गेल्या दहा दिवसात सभागृहात विविध महत्वाचे मुद्दे गाजले.
अधिवेशनाच्या पहिल्या एल्टन डिकॉस्ता यांनी सभापतींबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सत्ताधारी भाजपने गोंधळ घालत माफीची मागणी केली. या दोनवेळा कामकाज तहकूब करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी देखील याच मुद्यावरुन सत्ताधारी आग्रही राहिले मात्र आलेमाव आणि सरदेसाईंच्या मध्यस्तीनंतर मुख्यमंत्र्यांनी विषयावर पडदा टाकला.
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. शिवाय भाडेकरु पडताळणीचा विषय देखील गाजला.
रोड शोमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला. याच दिवशी म्हादई व्याघ्र प्रकल्प अधिसूचित करण्याची मागणी करण्यात आली.
सरकारला कर मिळत असल्याचे सांगत मंत्री गुदिन्हो यांनी गोवा माईल्सचे समर्थन केले. तसेच, स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी एका App वर येण्याची विनंती केली.
जनमत कौल दिवस आस्मिताय दिस म्हणून साजरा करण्याच्या आलेमाव यांच्या ठरावाला सकारात्मक प्रतिसाद देत सरकारने हा दिवस राज्यपातळीवर साजर करण्याचे आश्वासन दिले.
नव्या शिक्षण धोरणावरुन विरोधकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना घेरले. मुख्यमंत्री सावंत यांनी देखील सरकार घाई करणार नाही अशी ग्वाही दिली.
याशिवाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, खाण लिलाव, दक्षिण जिल्हा रुग्णालयातील खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि सिप्ला कंपनीतील अपघाताचे मुद्दे विधानसभेत गाजले.