Manish Jadhav
गोव्याचं निसर्ग सौंदर्य मोहिनी घालतं. गोव्यात दरवर्षी लाखो पर्यटक येतात.
तुम्ही गोव्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही गोव्यातील या पार्टी स्पॉटला नक्की भेट दिली पाहिजे.
दिवसभर गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर पहुडल्यानंतर तुम्ही संध्याकाळी पार्टीचा माहोल बनवू शकता. चला तर मग मनाला रुंजी घालणाऱ्या गोव्यातील या दोन पार्टी स्पॉट बद्दल जाणून घेऊया...
हिलटॉप हे गोव्यातील सर्वात जास्त लोकप्रिय पार्टी डेस्टिनेशन आहे. गोव्यातील सुंदर ठिकाणी झाडांच्या मधोमध म्युझिकवर थिरकण्यासाठी लोक इथे गर्दी करतात.
कर्लीज हा पार्टी स्पॉट गोव्यातील उत्तर भागात अंजुना बीचसमोर स्थित आहे.
लाइव म्युझिक, कॉकटेल्स आणि गोव्यातील सी फूड हे कर्लीजची खासियत आहे. हे ठिकाण मार्केटपासूनही खूपच जवळ आहे.