Manish Jadhav
गोव्याला मनाला भावणारं असं निसर्ग सौंदर्य लाभलय. दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात.
गोव्याला पर्यटन राज्य म्हणून ओळख मिळाली आहे. पण गोव्याची दुसरी बाजूही आहे. राज्यात बेकायदेशीर धंद्यांना थारा देण्यात आला. त्यापैकीच एक बेकायदेशीर धंदा म्हणजे 'मटका...'
राज्यात मटका या व्यवसायाला कायदेशीर मान्यता नाहीये. परंतु सर्सासपणे मटका चालतो.
सरकारला मटक्यातून तगडा महसूल मिळतो. राज्यात कलंगुट आणि इतर भागात चोरट्या मार्गाने मटका अजूनही सुरुच आहे.
'गोव्यात मटका अधिकृत करा', अशी मागणी गोव्यातील आघाडीचे नेते मायकल लोबो यांनी काही वर्षांपूर्वी केली होती.
गोव्यात अवैध मार्गाने चालणारा मटका व्यवसाय कायदेशीर केला तर गोवा सरकारच्या महसुलात वाढ होईल, असा तर्क त्यावेळी लोबोंनी दिला होता.
गोव्यात बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या मटका व्यवसायावर कारवाई करण्याकडे सरकार दुर्लक्ष करतयं.