Ganeshprasad Gogate
21 जानेवारीला पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने 'गोमेकॉ'मध्ये दाखल करण्यात आले.
अँजिओप्लास्टि झाल्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखाली गोमेकॉत विश्रांती घेत असलेले मंत्री बाबूश यांना 'स्मार्ट सिटी' च्या कामांची काळजी दिसून आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी महानगरपालिका अधिकारी मंत्री बाबूश यांना विचारपूस करण्यासाठी गेले होते.
परंतु यावेळी आजारी असलेल्या बाबूश यांनी त्यांच्याकडे स्मार्ट सिटीच्या कामांची विचारणा केली.
काही दिवसांपूर्वी उत्पल पर्रीकर आणि बाबूश यांच्यात स्मार्ट सिटीच्या कामाच्या दिरंगाईबाबत चांगलीच खडाजंगी झाली होती.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.