अयोध्येतील ऐतिहासिक सोहळ्यासाठी राजधानी सज्ज; पहा पणजीतील 'ही' आकर्षक सजावट

Ganeshprasad Gogate

प्राणप्रतिष्ठेला काही तासांचा अवधी-

अयोध्येतील राम मंदिरात उद्या म्हणजेच 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे.

Decoration | Dainik Gomantak

उत्साहाचे वातावरण-

या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण असून प्रत्येक राज्यात या सोहळ्याचा आनंद ओसंडून वाहताना दिसतोय.

Decoration | Dainik Gomantak

सोमवारी मद्य, मांस विक्रीवर निर्बंध-

गोव्यासह काही राज्यांनी या सोहळ्याचा निमित्ताने सर्व आस्थापनांना सुट्ट्या जाहीर केल्या असून गोव्यात काही पंचायतींनी सोमवारी मद्य, मांस विक्रीवरही निर्बंध घातले आहेत.

Decoration | Dainik Gomantak

राजधानी पणजीत सजावट-

गोव्यातील वातावरण राममय झाल्याचे दिसत असून राजधानी पणजीत अटल सेतूच्या खालील बाजूस तसेच दीवजा सर्कल येथे राम मंदिराच्या प्रतिकृती उभारलेल्या दिसून येताहेत.

Decoration | Dainik Gomantak

धनुष्याची प्रतिकृती-

तसेच श्रीरामांचे आयुध असलेल्या धनुष्याची प्रतिकृतीही आकर्षकरित्या उभारलेली आहे.

Decoration | Dainik Gomantak

सजावटीच्या कामावर अखेरचा हात-

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काही तास शिल्लक असताना गोव्यातील सजावटीच्या कामावर कामगार अखेरचा हात फिरवतानाचे रविवारी सकाळी दिसून आले.

Decoration | Dainik Gomantak
Rashid Khan | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी