Ganeshprasad Gogate
प्रजासत्ताक दिनानिमित्त दि.27 आणि 28 रोजी राजभवन सर्वसामान्य जनतेसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती सचिव एम.आर.एम. राव यांनी दिली आहे.
राव यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राजभवन खुले असणार आहे.
राजभवनला भेट देण्याची इच्छा असलेल्यांनी दि. 26 रोजी सायं. 6 वाजेपर्यंत राजभवन मुख्य द्वारावर नोंदणी करावी,
तसेच भेटीवेळी आधार कार्ड आणि ओळखपत्र आणावे. यावेळी दोन्ही दिवस विंटेज कारचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
यावेळेत जुन्या कारदेखील लोकांना पाहता येणार आहेत.
दरम्यान, याचवेळी राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी लिहिलेल्या सर्व दोनशे पुस्तकांचेदेखील प्रदर्शन भरविण्यात येईल.