Sameer Panditrao
गोवा छोटे राज्य असले तरी येथे भातशेतीला ऐतिहासिक महत्त्व आहे. कृषी संस्कृतीत भातशेतीचा ठसा आजही कायम आहे.
२०१९-२० मध्ये ३४,६९८ हेक्टरमध्ये भात लागवड झाली होती. २०२३-२४ मध्ये हे क्षेत्र घटून ३२,४७७ हेक्टरवर आले.
क्षेत्रफळ कमी असूनही भात उत्पादन वाढले आहे! २०१९-२० मध्ये १,३५,५६१ टन तर २०२३-२४ मध्ये तब्बल १,४२,०५६ टन भात मिळाला.
गोव्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात भातशेती होते. रब्बी हंगामात तुलनेने कमी प्रमाणात लागवड होते.
कोरगुट, आसगो, सोटी ही पारंपरिक भात बियाणे आजही घेतली जातात. मात्र जया, ज्योती यांसारखी नवी बियाणे अधिक पसंत केली जात आहेत.
शासनाकडून बियाणे, अवजारे, संरक्षण कुंपणासाठी अनुदान मिळते. तरीही शेतकरी भातशेतीकडे कमी प्रमाणात वळत आहेत.
पाच वर्षांत २,२२१ हेक्टर भातशेती क्षेत्र घटले आहे. उत्पादन वाढले तरी लागवडीत घट होणे ही गंभीर बाब ठरत आहे.