Sameer Panditrao
नाकातून रक्त येत असल्यास दूर्वांचा रस थोडी खडीसाखर मिसळून घेतल्याचा फायदा होतो.
कमी प्रमाणात वा थांबून थांबून लघवी होत असल्यास ३-४ चमचे दूर्वांचा रस घेण्याचा उपयोग होतो.
त्वचारोग, खाज येणे, त्वचारोग , सोरायसिस, एक्झिमा वगैरे त्रासांमध्ये दूर्वांचा रस घेण्याचा व बाहेरून लावण्याचा फायदा होतो.
दूर्वांचा रस घेण्याने यकृत, प्लीहा व मूत्रपिंडांची कार्यक्षमता वाढते असा अनुभव आहे.
नवप्रसूतेने दूर्वांचा रस घेतल्यास स्तन्याचे प्रमाण वाढते.
रक्ती मूळव्याधीच्या त्रासात तसेच पाळीच्या वेळी अति रक्तस्राव होत असल्यास दूर्वांच्या रसात थोडी खडीसाखर मिसळून घेतल्याचा फायदा होतो.
पित्त वाढल्यामुळे जुलाब वा उलट्या होत असल्यास दूर्वांचा रस थोडे दूध मिसळून घेतल्यास फायदा होतो.