Sameer Panditrao
वेंगुर्ले हे स्वातंत्र्यपूर्व काळात आशिया खंडातील पश्चिम किना-यावरील आयात-निर्यातीचे प्रमुख व्यापारी केंद्र होते.
पोर्तुगिज, डच यांची इथे सत्ता होती. वेंगुर्ले बंदराजवळील सागर बंगला, दीपगृह, इथली मंदिरे, फळसंशोधन केंद्र, विस्तीर्ण समुद्रकिनारा ही इथली आकर्षणे आहेत
इथली खाद्यसंस्कृतीही जरा हटकेच आहे.
इथल्या लहान-मोठ्या हॉटेलांतून उसळ - चौकोनी पाव आणि हाफ भजी, कटींग चाय यालाच जास्त मागणी असते.
हे चौकोनी पाव फक्त वेंगुर्ल्यातच बनविले जातात.
मीठ आणि साखर विरहीत असलेले हे पाव मैदा आणि चणाडाळ पिठाच्या फेसापासून बनविले जातात.
यामध्ये ‘इस्ट‘ हे प्रिझरेटीव्ह नसल्यामुळे २४ तासच हे पाव चांगले राहू शकतात.