Manish Jadhav
गोव्याला लाभलेलं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ पाडतं. निसर्गाची किमया पाहून पर्यटक सुखावून जातात.
गोव्यावर झालेली निसर्गाची उधळण पाहून पर्यटकांचं मन बावरं होवून नाचू लागतं. दरवर्षी गोव्याला लाखो पर्यटक भेट देतात.
गोव्याला एखदा भेट देणारा पर्यटक पुन्हा-पुन्हा इथं येणं पसंत करतो. गोवा पर्यटकांची जणू काही छोटीशी दुनियाच बनून जातो.
व्यस्त कामातून सुट्ट्या काढून गोव्याला येणारा पर्यटक इथला सुशेगातपणा (निवांतपणा) पाहून हरवून जातो.
गोव्यात तुम्ही अगदी भरभरुन शॉपिंग करु शकता. गोवन पद्धतीचे कपडे, दागिने खरेदी करण्याचा मोह आवरत नाही.
गोव्याला लाभलेली विलोभनीय सौंदर्याची खाण पाहून पर्यटकांचं मनही आईशप्पथ...गोवा मनी भरला... असं म्हणू लागतं.
गोव्यात तुम्ही या महिन्यात (ऑक्टोबर) नक्की भेट दिली पाहिजे. येथील ग्रामीण भागातील जत्रा, उत्सव पाहून तुम्ही भारावून जाल. विशेष म्हणजे तुम्हाला गोवन संस्कृतीचं खऱ्या अर्थानं दर्शन होईल.