Manish Jadhav
गोव्याचं मोहिनी घालणारं सौंदर्य प्रत्येकाला मनमोहीत तर करतं.
गोव्याची न्यारी दुनिया प्रत्येकाला खुणावते. तुम्हाला तुमची गोवा ट्रीप यादगार बनवायची असेल तर तुम्ही इथली प्रसिद्ध मार्केट्सना नक्की पाहिली पाहिजेत.
आज (2 ऑक्टोबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून गोव्यातील प्रसिद्ध दोन मार्केट्सबद्दल जाणून घेणारोत.
हे मार्केट गोव्यातील लोकप्रिय आणि उत्तम खरेदीचे ठिकाण आहे. अंजुना बीचवर दर बुधवारी आयोजित केला जाणारा, हा फ्ली मार्केट खऱ्या दुकानदारांसाठी नंदनवन आहे.
तुम्हाला शेकडो दुकाने दागिने, कपडे, लाकडी कलाकुसर, पादत्राणे, हस्तकला, हॅमॉक्स, चादरी, ट्रिंकेट्स आणि वॉल हँगिंग्ज विकणारी मिळतील. या बाजारपेठेत भारतीय तसेच परदेशी लोकांची मोठी गर्दी असते.
बागा रोडवरील तिबेटी मार्केटही शॉपिंग करण्यांसाठी पर्वणीच ठरते. इथे तुम्हाला दागिने, हस्तकला, कपडे, गुडी आणि ट्रिंकेट इत्यादींची विक्री करणारे असंख्य विक्रेते दिसतील.