Manish Jadhav
गोव्याचं विलोभनीय सौंदर्य पर्यटकांच्या काळजातील हळवा कोपरा बनलयं.
गोव्यात एककीडे तुम्हाला जंगी माहोल पाहायला मिळतो तर दुसरीकडे मन:शांतीची अनुभूती मिळते.
गोव्याला एकदा भेट दिली की, पर्यटक सारखं-सारखं येणं पसंत करतात. पर्यटकांचं दिलं गोव्यावर जडून जातं. त्यांचं कोवळं दिलही...'दिल दिल गोवा' म्हणून लागतं.
कल्पनेत साकारलेलं गोव्याचं निसर्ग सौंदर्य जेव्हा सत्यात पर्यटक पाहतात तेव्हा त्यांची अनुभूतीही समृद्ध होऊन जाते. 'गोव्यात लय फिरायला हाय...'
तुम्ही या महिन्यात (ऑक्टोबर) गोव्याला भेट देण्याचा प्लॅन बनवत असाल तुमच्यासाठी पर्वणी ठरेल.
तुम्ही तुमच्या गोवा ट्रीपमध्ये गोव्याचं ग्रामीण जीवनाचं अनुभव नक्की घेतला पाहिजे. संस्कृती, उत्सव, जत्रा यामधून तुम्हाला गोव्याची नव्याने ओळख होते.