Manish Jadhav
गोवा म्हणजे सर्वच पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय. देश-विदेशातील पर्यटक व्यस्त कामातून वेळ काढून गोव्याला भेट देण्यासाठी नक्की येतात.
समुद्र किनाऱ्यांव्यतिरिक्त येथील निसर्ग सौंदर्यही नेहमीच पर्यटकांना भुरळ पाडतं.
तुम्ही गोव्याचा प्लॅन बनवत असाल तर येथील अभयारण्ये नक्की पाहिली पाहिजेत. सलीम अली पक्षी अभयारण्याला भेट द्यायला बिलकुल विसरु नका.
सलीम अली अभयारण्यात विविध पक्ष्यांची प्रजाती आढळतात.
अभयारण्यातील सर्वात सुंदर पक्ष्यांपैकी एक म्हणजे लिटिल बिटर्न पक्षी. मूळचा अमेरिकेतील असलेल्या या पक्ष्याचा आवाज वाघासारखा असतो.
चील प्रजातीचा हा पक्षी पाण्याजवळ राहणं पसंत करतो. आपलं पोट भरण्यासाठी हा मासे आणि बेडकांवर अवलंबून असतो.
हा पक्षी पाण्याच्या किनाऱ्यावर आणि घनदाट जंगलामध्ये राहणं पसंत करतो. या प्रजातीचे पक्षी एकत्र राहणं पसंत करतात. हे पक्षी एका दिवसात 16 मासे खाणं पसंत करतात.
फळां-फुलांचा रस पिणारा हा पक्षी छोटा सनबर्ड म्हणून ओळखला जातो. फुलांचा रस पिताना हा पक्षी फार सुंदर दिसतो.