Pramod Yadav
वर्षोनुवर्षे चालत आलेली नरकासूर वधाची परंपरा यावर्षी देखील गोव्यात उत्साहात साजरी करण्यात आली.
आक्राळविक्राळ आणि महाकाय आकारातील नरकासुराच्या प्रतिमा राज्यभरात पाहायला मिळाल्या.
महाकाय नरकासूराची मिरवणूक काढल्यानंतर पहाटे या प्रतिमेचे दहन केले जाते.
नरकासूरच्या दहनानंतरच पहाटे खऱ्याअर्थाने गोव्यात दिवाळीला सुरुवात होते.
मोठ्या आवाजातील संगीताच्या ठेक्यावर ठिकठिकाणी निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये नागरिक सहभाग घेतात.
यावर्षीच्या नरकासुराच्या उत्सवावर पावसाचे सावट पाहायला मिळाले त्यामुळे काही ठिकाणचे नरकासूर पावसात भिजल्याने उत्साहावर विरजण पडले.
दिवाळीच्या एक ते दोन महिने अगोदरपासून राज्यातील तरुण नरकासूराची तयारी करत असतात.