Manish Jadhav
सह्याद्रीच्या निसर्गराजीत वसलेल्या गोव्याचं निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात खुलतं. पर्यटकांनी पावसाळ्यात जरुर गोव्याच्या निसर्ग सौंदर्याचे सुख अनुभवले पाहिजे.
गोव्याचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना साद घालतं. बघेल तिकडे हिरवीगार शेती, पावसाची संततधार आणि निसर्गाने धुक्याची पांघरलेली चादर पाहायला मिळते.
आज (9 जून) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून गोव्यात पावसाळ्यात कोणती ठिकाणे पाहिली पाहिजेत याविषयी जाणून घेणार आहोत...
गोव्यात सध्या पावसामुळे समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. पण पावसाळ्यात काबो-दे-रामा समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात.
पावसाळ्यात गोव्याची राजधानी पणजीपासून 10 किमी अंतरावर असलेले दिवार बेटाचं निसर्ग लालित्य खुलतं. तुम्हीही पावसाळ्यात गोवा ट्रीप प्लॅन करत असाल तर नक्की दिवार बेटाला भेट द्या.
पावसाळ्यात पर्यटक मोठ्यासंख्येने सिक्केरी किल्ला पाहण्यासाठी येतात. एकीकडे फेसाळता दर्या तर दुसरीकडे थंड गारवा पर्यटकांना मोहवून टाकतो.
तुम्ही पावसाळ्यात गोव्याला कोकण रेल्वेने येत असाल तर तुमच्यासाठी दूधसागर धबधबा पर्वणी ठरतो. गोव्याची शान असलेला हा धबधबा पर्यटकांना साद घालतो.
पावसाळ्यात गोव्याच्या प्राचीन स्थापत्यकलेचा अविष्कार असणाऱ्या तांबडी सुर्ला मंदिराला भेट दिलीच पाहिजे. पावसाळ्यात इथलं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मोहिनी घालतं.