Manish Jadhav
पावसाळ्यात गोव्याचं निसर्ग सौंदर्य खुलंत. गोव्यात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात पर्यटक येतात.
गोव्याला तुम्ही गेलात तर नक्की कायकिंगचा थरार अनुभवा. कोला बीच कायकिंगसाठी प्रसिद्ध आहे. पर्यटकांना हा बीच आकर्षित करतो.
गोव्यात तुम्ही साहसी जलक्रिडांचा अनुभव घेण्याचा विचार करत असाल तर वेकबोर्डिंग हा पर्याय खूप खास आहे. वेकबोर्डिंगकाठी एक बोर्ड वापरला जातो ज्यावर व्यक्ती उभी राहते आणि हँडल धरते, जे बोटीला जोडलेले असते.
गोवा-कर्नाटक सीमेवर असणारा दूधसागर धबधबा पर्यटकांचं आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पावसाळ्यात दूधसागर धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात.
जर तुम्ही गोव्याला भेट देण्यासाठी जात असाल तर अरम्बोळमध्ये मड बाथचा आनंद लुटू शकता.