Manish Jadhav
पावसाळा सुरु झाला की गोव्यातील निसर्ग सौंदर्य खुणावू लागतं. लोक मोठ्याप्रमाणात गोव्याला भेट देतात. येथील अभयारण्याची सैर करण्यासाठी पर्यटक येतात.
गोव्यात अनेक प्रसिद्ध अभायरण्ये आहेत. यातच आज आपण गोव्यातील सर्वात छोट्या अभयारण्याविषयी जाणून घेणार आहोत.
हे गोव्यातील इतर वन्यजीव अभयारण्यांपैकी सर्वात लहान आहे.
बोंडला अभयारण्य सर्वोत्तम अभयारण्यांपैकी एक आहे. हे सुमारे 8 चौरस किमी लांबीचे नैसर्गिक राखीव अंतर व्यापून किनार्यापासून थोडे दूर वसलेले आहे
तुम्हाला भारतीय बायसन, सांबर हरीण, मोर, खार अशा विविध प्रकारच्या वन्यजीव प्रजातींची विस्तृत श्रेणी पाहण्याची संधी मिळेल.
हे अभयारण्य उत्तर गोव्यातील फोंडा तालुक्यात आहे. पणजी आणि मडगाव अशा दोन्ही ठिकाणाहून येथे जाता येते.पणजीपासून 50 किलोमीटरवर हे अभयारण्य आहे.
गोव्यात एक दिवस घालवायचा असेल तर बोंडला अभयारण्याला आवश्य भेट द्या.