Salim Ali Birds Sanctuary: पावसाळ्यात करा सलीम अली पक्षी अभयारण्याची सैर!

Manish Jadhav

गोवा

दरवर्षी गोव्याला देश-विदेशातील लाखो पर्यटक भेट देतात. इथे निळाशार समुद्रकिनारा, अभयारण्ये, धबधबे पाहणे पर्यटक पसंत करतात.

Goa | Dainik Gomantak

गोव्यातील अभयारण्ये

गोव्यात आलेला पर्यटक आवर्जून अभयारण्याची सैर करतो. चला तर मग आज सलिम अली अभयारण्याविषयी जाणून घेऊया. तुम्हीही नक्की या पक्षी अभयारण्याला भेट द्या.

Salim Ali Birds Sanctuary in goa | Dainik Gomantak

सलिम अली अभयारण्य

चोराव बेटावर असलेले सलीम अली पक्षी अभयारण्य हे गोव्यातील सर्वात लहान संरक्षित अभयारण्यांपैकी एक आहे.

Salim Ali Birds Sanctuary | Dainik Gomantak

भारतीय पक्षीशास्त्रज्ञाचे अभयारण्याला नाव

भारतीय पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम मोइझुद्दीन अली यांच्या नावावरुन या अभयारण्याला नाव देण्यात आले आहे.

Salim Ali | Dainik Gomantak

दुर्मिळ पक्षांचे आश्रयस्थान

नैसर्गिकरित्या हे ठिकाण देशातील काही दुर्मिळ पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. जर तुम्ही पक्षीशास्त्रज्ञ किंवा पक्षी प्रेमी असाल तर तुम्ही या अभयारण्याला नक्की भेट द्या.

Salim Ali Birds Sanctuary | Dainik Gomantak

पणजीपासून जवळच!

राजधानी पणजीपासून 15 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रिबंदर घाटातून फेरी घेऊन तुम्ही सलीम अली पक्षी अभयारण्यात पोहोचू शकता.

Salim Ali Birds Sanctuary | Dainik Gomantak

विविध पक्षी

जांभळे बगळे, पांढरे बगळे, गरुड, किंगफिशर, सँडपायपर, वुडपेकर, पतंग, कॉर्मोरंट्स, मैना, ड्रोंगो आणि कर्ल्यू. दुर्मिळ प्रजातींमध्ये ब्लॅक अँड लिटल बिटर्न, जॅक स्निप, रेड नॉट आणि पाईड एव्होसेट यांचा समावेश होतो. तुम्हाला येथे मगरी, फिडलर खेकडे, कोल्हे, उडणारे कोल्हे, ओटर्स आणि मडस्कीपर देखील आढळतील.

Salim Ali Birds Sanctuary | Dainik Gomantak