Pramod Yadav
छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणारे अनेक शिवभक्त देशभरात पाहायला मिळतील.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची शिवभक्ती तर सर्वांना ज्ञात आहेच पण, त्यांच्याच सरकारमधील एक मंत्री देखील शिवभक्त आहेत.
समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई हे देखील एक सच्चे शिवभक्त असून, त्यांनी घरातच शिव मंदिर उभारले आहे.
सडेतोड आणि बाणेदार वृत्तीसाठी प्रसिद्ध असणारे फळदेसाई मुख्यमंत्री सावंत यांच्या जवळचे मानले जातात.
घरातच शिवरायांचे मंदिर उभारणाऱ्या फळदेसाईंच्या ह्रदयात शिवभक्ती ठासून भरली आहे.
मंत्री फळदेसाई दरवर्षी शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात भक्तीभावाने घरात साजरा करतात.
सांगे मतदारसंघाचे आमदार असणारे सुभाष फळदेसाई यांच्याकजे समाजकल्याण, नदी परिवहन व अभिलेख, पुरातत्व विभागाची जबाबदारी आहे.