Manish Jadhav
गोवा हे देशातील एक नयनरम्य पर्यटन स्थळ आहे, जिथे प्रत्येक क्षण जणू एका चित्रपटातील दृश्यासारखा वाटतो. दिवसाची धावपळ संपल्यानंतर गोव्याची संध्याकाळ अधिक मोहक आणि मंत्रमुग्ध करणारी भासते.
संध्याकाळी सूर्य मावळतानाचे दृश्य, समुद्राच्या लाटांचा गूज, आणि हवेत भरुन राहिलेला आल्हाददायक गारवा हे सर्व काही पर्यटकांना मोहित करते.
बागा, अंजुना, वागातोर यांसारख्या समुद्रकिनाऱ्यांवर संध्याकाळी फिरायला जाणे म्हणजे स्वर्ग सुखाची अनुभूती मिळते.
गोव्यातील संध्याकाळ केवळ एक वेळ नसून एक संपूर्ण अनुभव आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील शांततेपासून ते जल्लोषमय नाईटलाइफपर्यंत, येथे प्रत्येक जण आपल्या पसंतीनुसार वेळ घालवू शकतो.
पर्यटक आणि स्थानिक लोक समुद्रकिनारी शांततेची अनुभूती घेण्यासाठी जातात. समुद्रकिनारी बसून किंवा चालत सूर्यास्त पाहतात आणि तिथल्या शेकोटीभोवती गप्पा मारतात.
सूर्य हळूहळू क्षितिजाच्या मागे मावळतो, त्यावेळी समुद्राच्या लाटांवर सोनेरी किरणांची झळाळी पडते. गोव्यातील प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावरुन हा क्षण अनुभवणे वेगळ्याच आनंददायी अनुभूतीसारखे असते.