AI ची कमाल! 'या' कंपन्या देतायेत 1.5 कोटींपर्यंतचे पॅकेज

Manish Jadhav

आर्टिफिशियल इंटेलिजन्स

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय टेक्नॉलॉजीचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे.

AI | Dainik Gomantak

क्रेझ

या टेक्नॉलॉजीचा (Technology) वापर आणि क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. येत्या काळात एआय हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारं तंत्रज्ञान असू शकते. असं अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

AI | Dainik Gomantak

पगार

AI टेक्नॉलॉजी आणि मशीन लर्निंगमध्ये काम करणाऱ्या लोकांचा पगार इतर क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे.

AI | Dainik Gomantak

भारतीय स्टार्टअप

Krutrim, Sarvam AI, टर्बोएमएल, स्मॉलेस्ट आणि सोकेट लॅब्स सारख्या भारतीय स्टार्टअप्सनी नोकर भरतीचा धडाका लावला आहे.

AI | Dainik Gomantak

40 लाख ते 1.5 कोटी पर्यंतचे पॅकेज

हे स्टार्टअप्स दरवर्षी 40 लाख ते 1.5 कोटी रुपयांपर्यंतचे पॅकेज देत आहेत. तसेच फ्रेशर्स ते मिड-करिअर एआय इंजिनिअर्ससाठी स्टॉक ऑप्शन आणि फ्लेक्सिबल वर्क अरेंजमेंट्सची सुविधा उपलब्ध करुन देत आहेत. कंपन्यांच्या या निर्णयावरुन स्पष्ट होते की, प्रत्येक क्षेत्रात एआयची मागणी वाढत आहे.

AI | Dainik Gomantak

वाढती मागणी

टर्बोएमएल इंजिनियर आणि रिसर्चर्स नियुक्त करत आहे. कंपनी त्यांना दरमहा 1 लाख रुपये इंटर्नशिप स्टायपेंड आणि वार्षिक 80 लाख रुपये फूलटाइम देत आहेत. Smallest.ai चे संस्थापक 0-2 वर्षांचा अनुभव असलेल्या फुल-स्टक इंजिनियर्संना वार्षिक 40 लाख रुपये पगार देत आहेत, ज्यामध्ये त्यांनी कॉलेज किंवा कोणत्याही रिज्युमची मागणी केलेली नाही.

AI | Dainik Gomantak

डीपसीक

डीपसीकच्या वाढत्या लोकप्रियतेमध्ये, हायरिंग टेक फर्म फॅब्रिकने हाय क्वालिटी एआय टॅलेंटमध्ये भारताची पॉवर दाखवून देण्यासाठी 1,000 हून अधिक एआय/एमएल इंजिनियर्सचा डेटाबेस तयार केला आहे.

AI | Dainik Gomantak

स्मार्ट वर्क कल्चर

एआय कंपन्यांमधील उमेदवारांचा अनुभव महत्त्वाचा आहे, परंतु तो केवळ रिज्युम अपडेट करण्यासाठीच नाही. त्याऐवजी, त्यांना कठीण परिस्थितीत काम कसे हाताळायचे हे माहित असले पाहिजे. नवीन गोष्टींसह प्रयोग केले पाहिजेत. तसेच, कमी वेळेत जास्त काम केले पाहिजे. विशेष म्हणजे, जुन्या वर्क कल्चरऐवजी स्मार्ट वर्क कल्चरचा त्याने स्वीकार केला पाहिजे.

AI | Dainik Gomantak
Virat Kohli | Twitter
आणखी बघा